Sunday, August 7, 2016

जागतिक संगीत दिन

आज २१ जुन

आज जागतिक संगीत दिवस
संगीत माणसाला आत्मिक आनंद देत असते. संगीत भावनाशील माणसाला बेभान करते. संगीताच्या धूनने माणसं थिरकतात, नाचतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार प्रकट करतात. संगीत मानवी स्वास्थ्याला पोषक असते. जागतिक पातळीवर संगीत-दिन साजरा करण्याची प्रथा प्रथम फ्रान्सने पाडली. तिथे या दिवसाला फेटे डे ला म्युसिक्यू असे संबोधितात. वास्तविक, लेबोनिज लोकांच्या संगीत महोत्सवाचा एक भाग आहे. फ्रान्समधील एक ख्यातनाम संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळेच्या तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या सोहळ्याची सुरुवात केली होती. जगभर २१ जून या दिवशी संगीताचा महोत्सव साजरा होतो. हा संगीत-दिन साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत : * संगीताचा विविध प्रकारे प्रसार करणे. * नवखे तसेच तज्ज्ञ संगीतकारांना रोड- शो करण्यास प्रोत्साहन देणे. * फ्रान्समध्ये एक घोषणा आहे : फेटेस डे ला म्युसिक्यू (संगीत निर्माण करा). या घोषणेला प्रोत्साहन देणे. * लोकांना मोफत संगीत जलसे ऐकायला मिळावेत. * संगीत जलशांतून लोकांना भिन्न तर्‍हेच्या संगीताची अनुभूती मिळावी. * पॅरिस-स्थित असलेल्या संगीत ऍकॅडेमीकडून सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या संगीत कार्यक्रमांना अधिकृत मान्यता मिळावी. * फ्रेंच कायद्यानुसार अशाप्रकारच्या जलशांना रात्रीच्यावेळी अधिकृत परवानगी असते व त्याद्वारे होणारे ध्वनी-प्रदूषण स्वीकारार्ह मानले जाते. जगभर ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, ब्रिटन, लुक्झेम्बर्ग, जर्मनी, स्वीत्झर्लंड, कोस्टा रिका, इस्त्रायल, चीन, भारत, लेबोनन, मलेशिया, मोरोक्को, पाकिस्तान, फिलिपिन्स, रोमानिया, कोलोम्बिया या १७ देशात संगीत-दिन साजरा होतो. अमेरिकेतदेखील २००७ पासून, त्याचा प्रारंभ झाला आहे. संगीताच्या माध्यमातून, जगभर शांती पसरावी हा या दिवशीच्या साजरीकरणाचा हेतू आहे. या सोहळ्यात जे उपक्रम हाती घेतले जातात त्यात, संगीतकारांची विविध प्रकारच्या संगीताची अंत:करणे उलगडवून दाखविणारी भाषणे, कलाकारांचे परिसंवाद, संगीत स्पर्धा व कोडी, संगीताचे रेकॉर्डिंग, संगीत वाद्यांचे प्रदर्शन तसेच तत्संबंधी पेन्टिंग्स्, फलक, शिल्प, व्यक्तीरेखा, छायाचित्रे यांची प्रदर्शने शिवाय विविध देशातल्या संगीततज्ज्ञांना आमंत्रणे देऊन त्यांचे कार्यक्रम आयोजित करणे यांचा समावेश असतो. यंदा, या संगीत दिनाचा तिसावा वर्धापन दिन आहे आणि फ्रान्समध्ये तो धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. पॅलेस रॉयल गार्डन या ठिकाणी होणार्‍या संगीत-रजनीमध्ये नामवंत संगीतकारांना जनतेसमोर आपली कलाकारी पेश करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ‘युनेस्को’च्या जगभर शांती प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टातून, संगीत विशारद लॉर्ड मेहुदी मेनुहीन यांनी १९७५ साली आंतरराष्ट्रीय स्तरावर संगीत दिवसाचा प्रारंभ केला होता, त्याचाही हेतू सर्वसामान्यांना संगीताभिमुख करण्याचा होता. त्यानुसार, १ ऑक्टोबरला १९७५ हा आंतरराष्ट्रीय संगीत-दिन म्हणून साजरा झाला होतो.

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Comments system