Sunday, August 7, 2016

रियाज

रियाज़



रियाज़ स्वत:साठी असतो.
चालून आलेल्या पायवाटेचा
तो शोध असतो.
शोध एका क्षणांत लागत नाही.
अनेक प्रसंगांपैकी एखादा सिद्ध होतो. तो सिद्ध होणारा क्षण
सापडेपर्यंत आपण
त्या शोधाच्या सान्निध्यात असतो.
त्या झपाटणाऱ्या वेडाचा
सहवास हेच संगीत.
रियाज़ म्हणजे नामस्मरण !
कार्यक्रम म्हणजे आरती.
कार्यक्रमाला अनेकजण येतात.
त्यांचे उद्देशही वेगळे असतात. आरतीमध्ये
देहभान हरपणारे
फार थोडे.
आरती म्हणणाराही
प्रत्येकवेळी हरवतोच असं नाही. नामस्मरण
केवळ स्वत:साठी असतं.
नामजप करणारे आपणच.
ऐकणारेही आपणच.
मीच गायक, मीच श्रोता.
मीच माझ्यावर नाराज़ व्हायचं.
मीच खूश व्हायचं.
खूश होण्याचे क्षण कमी असतात. कारण
स्वत:ला प्रसन्न करणं
फार अवघड असतं.
प्रत्येक वेळी
तुमच्यापेक्षा
उंच शिखर तुम्हाला खुणावतं. मैफलीत तसं नसतं.
तुम्ही जीव ओतून गायलात
तरी ऐकणाराला
सगळं गाणं ऐकू जात नाही. प्रत्येकाला
वैयक्तिक कुवतीप्रमाणे
स्वरांची ओळख झालेली असते. तेवढंच गाणं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. तर
काही रसिकांची उंची
अफाट असते.
तिथं आपल्याला जाता येत नाही.
मग जशी टीका सहन होत नाही,
तशी नावाजणीही पेलत नाही.
मैफल
तुमच्या मालकीची नसते.
तिचं यशापयश
अनेकांच्या स्वाधीन असतं.
मैफल संपूर्ण यशस्वी झाली
तरीही काही जागा
श्रोत्यांना हेरताच आल्या नाहीत
हे शल्य मागं उरतं.
ज्या व्यक्तीने
संगीताचा व्यासंग केला आहे,
त्याला स्वरास्वरामागील
रियाज़ ऐकू येत असतो..



लेखिका
आचार्या प्रभा अत्रे

No comments:

Post a Comment

Disqus Shortname

Comments system

Sunday, August 7, 2016

रियाज

रियाज़



रियाज़ स्वत:साठी असतो.
चालून आलेल्या पायवाटेचा
तो शोध असतो.
शोध एका क्षणांत लागत नाही.
अनेक प्रसंगांपैकी एखादा सिद्ध होतो. तो सिद्ध होणारा क्षण
सापडेपर्यंत आपण
त्या शोधाच्या सान्निध्यात असतो.
त्या झपाटणाऱ्या वेडाचा
सहवास हेच संगीत.
रियाज़ म्हणजे नामस्मरण !
कार्यक्रम म्हणजे आरती.
कार्यक्रमाला अनेकजण येतात.
त्यांचे उद्देशही वेगळे असतात. आरतीमध्ये
देहभान हरपणारे
फार थोडे.
आरती म्हणणाराही
प्रत्येकवेळी हरवतोच असं नाही. नामस्मरण
केवळ स्वत:साठी असतं.
नामजप करणारे आपणच.
ऐकणारेही आपणच.
मीच गायक, मीच श्रोता.
मीच माझ्यावर नाराज़ व्हायचं.
मीच खूश व्हायचं.
खूश होण्याचे क्षण कमी असतात. कारण
स्वत:ला प्रसन्न करणं
फार अवघड असतं.
प्रत्येक वेळी
तुमच्यापेक्षा
उंच शिखर तुम्हाला खुणावतं. मैफलीत तसं नसतं.
तुम्ही जीव ओतून गायलात
तरी ऐकणाराला
सगळं गाणं ऐकू जात नाही. प्रत्येकाला
वैयक्तिक कुवतीप्रमाणे
स्वरांची ओळख झालेली असते. तेवढंच गाणं त्यांच्यापर्यंत पोहोचतं. तर
काही रसिकांची उंची
अफाट असते.
तिथं आपल्याला जाता येत नाही.
मग जशी टीका सहन होत नाही,
तशी नावाजणीही पेलत नाही.
मैफल
तुमच्या मालकीची नसते.
तिचं यशापयश
अनेकांच्या स्वाधीन असतं.
मैफल संपूर्ण यशस्वी झाली
तरीही काही जागा
श्रोत्यांना हेरताच आल्या नाहीत
हे शल्य मागं उरतं.
ज्या व्यक्तीने
संगीताचा व्यासंग केला आहे,
त्याला स्वरास्वरामागील
रियाज़ ऐकू येत असतो..



लेखिका
आचार्या प्रभा अत्रे

No comments:

Post a Comment