ग्वाल्हेर घराणे भारतीय हिंदुस्तानी संगीतातील सर्वात प्राचीन घराणे आहे. उस्ताद नथ्थन पीरबख्श या घराण्यांचे संस्थापक मानले जातात. दिल्लीच्या राजाने यांना आपल्या जवळ बोलावून आपल्या राजदरबारी राजगायक म्हणून ठेऊन घेतले. उस्ताद नथ्थन पीरबख्श यांना दोन मुले होती कादीर बख्श आणि पीर बख्श. कादीर बख्शला ग्वाल्हेरच्या महाराज दौलतरावांनी आपल्या दरबारात गायक म्हणून ठेऊन घेतले. कादीर बख्शला क्रमश: तीन मुले झाली. हद्दू खाँ , हस्सू खाँ, नत्थु खाँ. हे तीनही भाऊ ग्वाल्हेरच्या दरबारात ख्याल गायक म्हणून प्रसिद्ध झाले. यांच्या शिष्य परंपरेमध्ये प्रमूख बाळकृष्णबूवा इचलकरंजीकर हे होत.
संस्थापक
हद्दू खाँ , हस्सू खाँ
गायकी विशेषता
1) खुल्या आवाजाचे गायन
2) ध्रुपद अंगाचे गायन
3) विशेष ढंगात आलापाची गायकी
4) सरळ सपाट तानांचा प्रयोग
5) गमकांचा प्रयोग
6) बोलतानांचा विशेष प्रयोग
संस्थापक
हद्दू खाँ , हस्सू खाँ
गायकी विशेषता
1) खुल्या आवाजाचे गायन
2) ध्रुपद अंगाचे गायन
3) विशेष ढंगात आलापाची गायकी
4) सरळ सपाट तानांचा प्रयोग
5) गमकांचा प्रयोग
6) बोलतानांचा विशेष प्रयोग
शिष्यावली
- बालकृष्ण बुआ इचलकरजीकर
- विष्णु दिगम्बर पलुस्कर
- ओंकारनाथ ठाकुर
- विनायक राव पटवर्धन
- नारायण राव व्यास
- वीणा सहस्रबुद्धे